spot_img
spot_img

💥BREAKING! ‘द बर्निंग गॅरेज!’ – तब्बल 10-12 चारचाकी वाहनांसह 10 -15 लाखांचे स्पेअर पार्ट्स आगीच्या भक्ष्यस्थानी!

मलकापूर (हॅलो बुलडाणा) मलकापूरच्या बुलढाणा रोडवरील सानिया कार गॅरेजमध्ये आज पहाटे 5 वाजता भीषण आग लागली. या आगीत दुरुस्तीसाठी आलेल्या 10-12 चारचाकी वाहनांसह 10-15 लाखांचे स्पेअर पार्ट्स जळून खाक झाले. प्राथमिक अंदाजानुसार, लाखोंच्या घरात आर्थिक नुकसान झाल्याचे समोर आले आहे.

सूत्रांनुसार, गॅरेजमध्ये उभी असलेल्या स्विफ्ट डिझायर गाडीला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने रौद्र रूप धारण करून इतर वाहनांनाही आपल्या कवेत घेतले. लाखोंचे महागडे स्पेअर पार्ट्सही जळून भस्मसात झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. चालक वासुदेव भोपळे आणि अग्निशमन दलाने तीन तासांच्या शर्तीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही,मात्र गॅरेजमधील वाहनांचा आणि सामग्रीचा राख होत लाखोंचा फटका बसला आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!