spot_img
spot_img

💥BREAKING! प्रवाशांच्या वादामुळे बस ट्रकला धडकली! – 6 ते 7 प्रवासी जखमी!

मेहकर (हॅलो बुलडाणा) अपघातांच्या घटना दिवसागणीक वाढताहेत.काही वेळापूर्वी आणखी एक अपघाताची बातमी हाती आली. मेहकर वरून छत्रपती संभाजीनगर कडे जाणाऱ्या बसने एका ट्रकला मागून धडक दिल्याने या अपघातात 6 ते 7 प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.विशेष म्हणजे बस मध्ये दोन प्रवाशांचे वाद झाले होते या वादामुळे बस चालकाचे स्टेरिंग वरील नियंत्रण सुटल्याचे सांगण्यात येत आहे.

मेहकर वरून छत्रपती संभाजी नगर कडे जाणारी ही बस ब्राह्मण चिकना जवळील पेट्रोल पंप जवळ एका ट्रकला धडकली.एसटी बस मधील प्रवाशांपैकी 2 प्रवाशांचा वाद झाल्यामुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येत आहे.अपघातातील जखमींना बीबी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.घटनास्थळावर बीबी पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!