शेगाव (हॅलो बुलडाणा /महेंद्र मिश्रा) शेगावच्या गजानन महाराज मतिमंद निवासी विद्यालयात काल विद्यार्थ्यांना दिलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. जेवणानंतर काही विद्यार्थ्यांना उलट्या, जीव मळमळणे आणि मोशनमध्ये रक्त येण्याची लक्षणे दिसू लागली. एकूण 15 – 20 विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.प्रकरण गंभीर बनल्यानंतर तहसीलदार दीपक बाजड, एसडीओ रामेश्वर पुरी, आणि शेगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार नितीन पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत त्वरित कारवाई केली. डॉक्टर अमोल नाफडे यांच्या नेतृत्वाखाली उपचार सुरू करण्यात आले असून, काही गंभीर विद्यार्थ्यांना अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात रेफर करण्यात आले आहे.
दुर्दैवाने, आधीपासून आजारी असलेल्या एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली असल्याची माहिती मिळत आहे. शाळेचे मुख्याध्यापक, संस्थापक आणि परिचारिका यांच्या हलगर्जीपणामुळेच हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक संशय व्यक्त होत आहे.शाळेतील व्यवस्थापनाविरोधात तक्रारीचा सूर उठत असून, दोषींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.