spot_img
spot_img

💥💥💥पक्षप्रवेश! – मा.आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपात नव्या चेहऱ्यांचा प्रवेश! – जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांचे कार्यकर्त्यांना स्फूर्तीदायक मार्गदर्शन!!

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) भारतीय जनता पक्षाच्या सदस्यता महाअभियानाला बुलडाण्यात जोरदार प्रतिसाद मिळत आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष डॉ. गणेश मांटे यांच्या नेतृत्वाखाली व मा. आमदार विजयराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाचा विस्तार सुरू आहे.

आज बुलडाणा येथील शिवालय जनसंपर्क कार्यालयात भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष डॉ. मांटे यांनी कार्यकर्त्यांना सदस्यता नोंदणीला गती देण्याचे आवाहन केले. “भाजपा हा निवडणुकांपुरता मर्यादित नसून संघटन मजबूत करण्यासाठी बूथ स्तरावर काम करणारा पक्ष आहे,” असे त्यांनी सांगितले.

मा. आमदार विजयराज शिंदे यांनी सदस्यता अभियानाचे महत्व विशद करत कार्यकर्त्यांना अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केले.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते मोहन निमरोठ, विजय भोसले, प्रभाकर जाधव, विनोद गवई यांच्यासह अनेकांनी भाजपा प्रवेश केला. जिल्हाध्यक्ष डॉ. मांटे यांनी नवनियुक्त सदस्यांचे स्वागत केले.कार्यक्रमास भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सचिव विश्राम पवार, जिल्हा सचिव सुनील देशमुख, महिला मोर्चा माजी जिल्हाध्यक्ष सिंधूताई खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचालन माजी शहराध्यक्ष अनंता शिंदे यांनी केले.

भाजपाच्या सदस्यता अभियानामुळे पक्षाला स्थानिक पातळीवर अधिक बळकटी मिळण्याची अपेक्षा आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!