मेहकर (हॅलो बुलडाणा) बुलढाणा जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकीचे अनेकांना वेध लागलेत.विशेषता मेहकर तालुक्यातून किशोर गारोळे हे आश्वासक चेहरा म्हणून समोर येत असून, त्यांचे ‘नगराध्यक्ष’ पद फिक्स असल्याचे त्यांच्या समर्थकांकडून दावा करण्यात येत आहे. याबाबत सोशल माध्यमांवर व्हिडिओ फोटो व्हायरल होताहेत.
“हा दावा व्यर्थ ना व्यर्थ ही बढाई.. जिंकणार आहे मी उद्याची लढाई!” असा विश्वास आतापासूनच किशोर गारोळे यांचे समर्थक व्यक्त करीत आहेत.त्याला अनेक कांगोरे आहेत.ते म्हणजे पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत म्हणा की,अन्य बाबतीमध्ये ते किंगमेकर म्हणून ओळखले जातात. समाजसेवेत ते अग्रस्थानी असतात. गोरगरिबांना मदत करण्याचा त्यांचा स्वभाव अनेकांच्या मनात घर करून आहे.सध्या नगरपालिका निवडणूक जाहीर झाल्या नसल्या तरी,आगामी काळात ह्या निवडणुका होणार आहेत.दरम्यान किशोर गारोळे यांनी नगरपालिका निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केली असून,त्यांचा नगराध्यक्षपदी निवडून येण्याचा चांगलाच बोलबाला दिसून येत आहे.त्यामुळे ‘कामाला लागा’असे किशोर गारोळेच म्हणत नाहीत तर त्यांचे चाहते देखील असे आवाहन करीत आहेत.