spot_img
spot_img

💥EXCLUSIVE – चर्चेतील बातमी! कपाळावर अवतरला ॐ चा टिळा अन् चर्चेत आला ‘धनंजयचा साखरपूडा!’

रायपूर (सचिन जयस्वाल/ हॅलो बुलडाणा) समाजात काही अजब गजब गोष्टी घडतात.रायपूर येथील धनंजय जयस्वाल यांचा संभाजीनगर जवळील चौका गावात साखरपूडा सोहळ्या दरम्यानही अशी चमत्कारिक घटना समोर आली. धनंजय यांच्या कपाळावर टिळक व तांदळाच्या अक्षद लावल्यावर अचानक ओमची प्रतिकृती अवतरल्याने क्षणातच पाहुणे आश्चर्यचकित झाले आणि चर्चेला तोंड फुटले! परंतू ‘हॅलो बुलढाणा’ याचे समर्थन करते असे नाही,हे महत्वाचे!

सध्या लग्नसराईचे दिवस आहेत.
पत्रिका जुळल्या आणि नवरा-नवरींची एकमेकांची पसंती झाली की वधू-वरांच्या कुटुंबीयाकडील लोक लग्न ‘पक्के’ करण्यासाठी साखरपुडा हा विधी करतात. पूर्वी या विधीला ‘कुंकू लावणे’ म्हणत. बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर येथील धनंजय अनिल जयस्वाल या युवकाचा साखरपुड्याचा कार्यक्रम डिसेंबर रोजी संभाजीनगर जवळील चौका या गावातील मयुरी रामलाल जयस्वाल नावाच्या मुलीशी ठरला होता. या कार्यक्रमात धनंजय यांना कपाळावर टिळा व तांदळाच्या अक्षदा लावल्यानंतर अचानकपणे ओम या शक्तिशाली आणि प्रभावी प्रतिकृती दिसायला लागली.त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसून चर्चेला उधाण आले होते.मान्यतेनुसार, ‘ओम नमः शिवाय’ या मंत्राचा जप केल्याने महादेवाची विशेष कृपा होते आणि सर्व समस्या दूर होऊ शकतात व मनोकामना देखील पूर्ण होतात असे शिवपूराणात म्हटले आहे. तसेच कपाळावर तीळ लावल्याने शांती आणि ऊर्जा मिळते असे म्हटले जाते. त्यामुळे चंदन,अष्टगंध सिंदूर भस्म गुलाब असे अनेक प्रकारचे टिळक लावले जाते.टिळक लाला ने व्यक्तिमत्त्वात सात्विकता दिसून येते तसेच टिळा लावण्याचे अनेक मानसिक परिणाम देखील असल्याचे जाणकार सांगतात.असे असले तरी सध्या मात्र धनंजय जयस्वाल यांच्या साखरपुड्यातील ‘ओम’ची टिळ्यातून अवतरलेली प्रतिकृती चर्चेचा विषय ठरली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!