बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शर्यतीत नव्हते मात्र,वडिलांच्या पुण्याईने महायुतीचे आमदार ॲड. आकाश फुंडकर कामगार मंत्री झालेत आणि अन्य 3 जणांचा दावा फोल ठरला! आता पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू आहे.परंतु सूत्रांच्या माहितीनुसार, पालकमंत्रीपद भाजपाच्या आकाश फुंडकर यांनाच मिळणार असल्याचे संकेत आहेत.दरम्यान शिंदे सेना आणि राष्ट्रवादी यांची भूमिका काय राहील? याकडे जिल्हावासियांचे लक्ष लागले आहे.
जळगाव जामोद चे माजी मंत्री डॉ. संजय कुटे, विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष चैनसुख संचेती,चिखलीच् या आमदार श्वेता महाले यांच्या मंत्रिपदाची चर्चा अखेरच्या क्षणापर्यंत होती. त्याचवेळीअखेर पर्यंत स्पर्धेत नाव नसलेल्या अॅड. आकाश फुंडकर यांच्या गळ्यात अनपेक्षितपणे मंत्रिपदाची माळ पडली. त्यामुळे इतर तीनही आमदारांनी आता धीर धरला की नाही हे माहीत नाही. तर डॉ. संजय कुटे यांनी मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी भूमिकाही समाजमाध्यमांवर मांडली.दरम्यान शिंदे सेना व राष्ट्रवादीचा आता जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी हस्तक्षेप सुरु आहे. परंतु आकाश फुंडकर यांनाच पालकमंत्री पद मिळणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.