बुलढाणा (हॅलो बुलडाणा) चॉकलेट साठी बालहट्ट धरताना आपण लहान मुलांना पाहिलं असेल ! पण चिखली रोडवरील संत गाडगेबाबा नगरात भक्ती नामक एका वर्षाच्या मुलीने चक्क राजकीय हट्ट धरलाय! तिची भक्ती राजकीय आहे किंवा काही हे माहीत नाही, परंतु ती रोज शिवसेनेच्या धनुष्यबाणचा असलेला बिल्ला ड्रेसवर लावून मागतेय.कोणत्याही पक्षाशी संबंध नसलेल्या आई बाबांना हा हट्ट पुरवावा लागतोच! हा चिमुकलीचा बालहट्ट दररोजचा आहे.त्यामुळे एक वर्षाची चीमुकली ‘कट्टर शिवसैनिक’ असा तिचा आता नावलौकिक होत आहे.
बुलढाणा जिल्ह्याचे आमदार संजय गायकवाड हे काठावर पास झाली असली तरी त्यांचा,नावलौकिक कायम आहे.त्यांनी विधानसभा निवडणुकीचे पूर्वी वाटलेले धनुष्यबाणाचे बिल्ले घरोघरी पोचले होते.हाच एक बिल्ला चिखली रोड वरील भक्ती नावाच्या एका एका वर्षाच्या मुलीच्या हाती लागला.मग काय भक्ती दररोज हा बिल्ला खेळणे म्हणून खेळायची!कुणी हात लावला तर,आग पाखड करायची!तिला अनेकांनी विचारले होते..कोण निवडून येणार?ती केवळ तिच्या भाषेत धनुष्यबाण दाखवत होती!कारण या धनुष्यबाणाशी तिचे वेगळेच नाते जुळले होते की काय?हे कोणालाही समजले नाही.निवडणूक पार पडली संजय गायकवाड निवडून आले.तरीही भक्तीची धनुष्यबाणावरील भक्ती अजून कायम आहे!














