बुलढाणा (हॅलो बुलडाणा) आज ‘सिटी न्यूज’ कार्यालयात शुभेच्छांचा पाऊस रिपरिपतोय.. निमित्त आहे ते जितूभाऊंच्या वाढदिवसाचे! या शुभेच्छांच्या पावसात विविध क्षेत्रातील विशेष म्हणजे राजकीय क्षेत्रातील मान्यवरांची चहाचा झुरका घेत रंगताहेत ती वातावरण तापवणारी आगामी नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणूक संदर्भातील गप्पाष्टकं!
आज ‘सिटी न्यूज’ वृत्तवाहिनी,’दैनिक जनसंचलन’ व ‘हॅलो बुलढाणा’चे सर्वेसर्वा जितेंद्र कायस्थ यांचा वाढदिवस उत्साहात साजरा होतोय.त्यांना शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मा. नगराध्यक्ष गोकुलजी शर्मा महाविकास आघाडीचे व विविध संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या कारंजा चौकातील कार्यालयात गर्दी करताहेत. त्यांच्या चाहत्यांची ही गर्दी त्यांचे पत्रकारितेतील समाजभान अधोरेखित करत असून पुष्पगुच्छ आणि शुभेच्छा, अभिनंदनाचा हा पाऊस अविस्मरणीय असा ठरत आहे. राजकीय क्षेत्रातील दिग्गज या प्रसंगी आगामी जिल्हा परिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुकी संदर्भात चर्चा करीत असून, अनेक तर्कवितर्क लढविल्या जाताहेत.एकंदर काय तर.. शुभेच्छांचा पाऊस अन् अगामी जि.प. आणि न.पा. निवडणूकीच्या खमंग चर्चेने भाऊंच्या वाढदिवसात चांगलाच रंग भरला आहे.














