spot_img
spot_img

💥💥 BREAKING! – मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने निष्पाप जिवाला चिरडले! काय होती ‘त्या’ निष्पापाची चुकी?

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) मद्यधुंद सागर आडवे नावाच्या ट्रॅक्टर चालकाने वृंदावन नगरातील एकेरी रस्त्यावर बेफाम ट्रॅक्टर दमटून एका निष्पाप श्वानाच्या पिल्लाचा जीव घेतला आहे.

बुलढाणा शहराला लागून असलेल्या वृंदावन नगर मधून माळविहीरकडे जाणाऱ्या एकेरी रस्त्यावर सतत वाहनांची ये जा सुरू असते.रस्ता चांगला असल्याने सुसाट वाहने चालवणारे आपल्या धुंदीत सर्वकाही विसरून जातात.आज सायंकाळच्या वेळी गणपती मंदिराजवळून जाताना एका मद्यधुंद ट्रॅक्टर चालकाने एका कुत्र्याच्या पिल्लास चिरडले.
उपस्थितांनी सदर ट्रॅक्टर चालकाला थांबवण्याचा प्रयत्न केला मात्र तो पळून जात होता.पण तो नशेत असल्याने त्याला बोळीतून
समोर पळता आले नाही.त्यामुळे त्याला नागरिकांनी पकडुन चांगलेच धारेवर धरले. या परिसरात अपघात झाला तेथे रोज लहान मुले खेळत असतात. दरम्यान अशा मद्यधुंद चालकावर यंत्रणेने अंकुश लावावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!