spot_img
spot_img

💥EXCLUSIVE – पाहूणं नव्हेत .. कार्यकर्त्यांनो जेवलात का? राजकीय फोडणी अन् कर्तुत्वाचा सुवास! -शपथ घेतल्यानंतर नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी उपाशी कार्यकर्त्यांना भरावाला स्वतः घास!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) शिवसेना शिंदे गटाचे डॉ. संजय रायमुलकर यांना चारी मुंड्या चित केल्यानंतर नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात यांनी शपथ ग्रहण सोहळा पार पडला.परंतु विशेष बाब अशी की, या शपथ ग्रहण सोहळ्याला आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते यांना त्यांनी स्वतः खमंग मेजवानी दिली. अगदी स्वयंपाक गृहात जाऊन भाजीला फोडणी देऊन पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना जेवू घातले.त्यांची ही रुचकर मेजवानी अनेकांना भावली आणि याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाले आहे.

कार्यकर्ते आपल्या नेत्यासाठी झटत असतात.लोणार मेहकर विधानसभा मध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अभेद गडाला सुरुंग लावणारे सिद्धार्थ खरात यांचा जायंट किलर म्हणून उल्लेख होत आहे.यात सिद्धार्थ खरात यांनी शपथ घेतल्यानंतर सोबत आलेल्या कार्यकर्त्यांसाठी स्वतः स्वयंपाक गृह गाठले आणि त्यांच्यासाठी स्वयंपाक करून त्यांना दोन घास भरवले.असा आमदार आता तरी दिसून आला नाही.परंतु सिद्धार्थ खरात यांनी आपल्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांची एक प्रकारे प्रतिष्ठा जपली आहे. त्यांनी निवडणुकीपूर्वी देखील कार्यकर्त्यांना जोडून ठेवले होते.आणि हेच कार्यकर्ते त्यांच्या विजयाचे शिल्पकार असल्याचे म्हटले जात आहे.त्यामुळे नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थ खरात त्यांच्यासाठी मागे तरी हटणार कसे?त्यामुळे त्यांनी शपथ घेतल्यानंतर चक्क स्वयंपाक गृह गाठून आपल्या कार्यकर्त्यांना रुचकर अशी मेजवानी दिली. याचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला असून त्यांची खूप प्रशंसा होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!