spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! आ.संजूभाऊंचा ‘जुना’ कार्यकर्ता पुन्हा सोबतीला!

बुलढाणा (हॅलो बुलडाणा) बुलडाणा शहरात शिवसेनेला मोठा बळकटीचा आधार मिळाला आहे, कारण आ. संजय गायकवाड यांचे जुने विश्वासू निष्ठावंत सहकारी बबलू मावतवाल यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. मावतवाल हे गायकवाड यांच्यासोबत विविध संकटकाळात खंबीरपणे उभे राहिलेले सहकारी म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पुनःप्रवेशामुळे बुलढाणा शहरात शिवसेनेची ताकद वाढेल, असा विश्वास स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे. मावतवाल यांची संजय गायकवाड यांच्यावरची निष्ठा आणि त्यांचे कार्यक्षेत्रातील जुने संबंध हे आ.संजूभाऊंच्या यांच्या नेतृत्वाला आणखी भक्कम करण्यास मदत करतील.

शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये या पुनर्बांधणीमुळे उत्साहाचे वातावरण आहे. बबलू मावतवाल यांच्या सहभागाने बुलढाण्यातील शिवसैनिकांना आणखी एक अनुभवी मार्गदर्शक लाभला असून, आगामी राजकीय आव्हानांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी शिवसेना बुलढाणा शहरात अधिक सज्ज झाली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!