बुलढाणा (हॅलो बुलडाणा) विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी उद्धव ठाकरे यांची बुलढाण्यात हजारोंच्या संख्येत जाहीर सभा झाली या सभेत महाविकास आघाडीतील मान्यवरांच्या उपस्थित माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी त्यांच्या रोखठोक भाषणात सध्याचे विद्यमान आमदार संजय गायकवाड यांच्यावर जोरदार टीका केली. सपकाळ यांनी गायकवाड यांना “टपरीबाज,” “छपरीबाज,” “गुडशाही,” आणि “फेकूचंद” अशा नावांनी हिणवले.त्यांनी गायकवाड यांच्यावर आरोप करताना त्यांच्या कार्यपद्धतीवर आणि नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.सपकाळ यांच्या या टिकेमुळे बुलढाणा विधानसभा निवडणुकीतील वातावरण तापले असून, निवडणुकीत रंगत येण्याची चिन्हे आहेत.
क्रमशः











