spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! प्रशांत डिक्कर देणार डॉ.कुटेंना टक्कर! -लाडक्या बहिणीकडून निवडणुकीच्या प्रचारासाठी 1 लाख 64 हजार रुपये डिक्कर यांना सुपूर्द ! -सोनाळात प्रचाराचा नारळ फुटला !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) नियोजनबद्ध प्रचार पद्धत व तत्पर कार्यशैलीमुळे मतदारांमध्ये वाढलेली लोकप्रियता प्रशांत डिक्कर यांच्या जमेच्या बाजू असून त्यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली आहे.आमदार संजय कुटे यांना प्रशांत डिक्कर टक्कर देणार असल्याचे चित्र असून कुटे यांचा गड ढासाळणार असल्याची चर्चा रंगत आहे.

परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार प्रशांत डिक्कर यांनी संत सोनाजी महाराज सोनाळा येथे महाराजांच्या दरबारात नारळ फोडुन प्रचाराची दणक्यात सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार व महायुतीचे उमेदवार संजय कुटे यांची 40 वर्षाची प्रस्थापित घराणेशाही संपुष्टात आणण्यासाठी आता मतदार सज्ज झाल्याचे दिसते. भुमीहिन शेतमजूरांचा मुलगा प्रशांत डिक्कर यांना जनतेने लोकवर्गणीतून निवडणुकीच्या विजयाच्या रिंगणात उतरवले आहे. अनेक वर्षांपासून वनवासात जीवन जगणाऱ्या गोर गरीब जनसामान्य माणसाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करुन सन्मानाचे जीवन जगता यावे यासाठी 16 वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या प्रशांत डिक्कर यांना विधानसभेत पाठवा हा एकच नारा मतदारांमधे ऐकायला मिळत आहे. राजकीय पक्षाचे उमेदवार अब्जाधीश असल्याने प्रशांत डिक्कर यांच्या गरिबीचा फायदा घेत विरोधकांनी बदनाम करण्याचे हत्यारे उपसले आहेत.मतदार संघातील मुळ प्रश्न कापूस सोयाबीन भाववाढ, शेतमजूरांसाठी स्वतंत्र मंडळ, महिला बचत गटांचे प्रश्न, आदिवासी जात प्रमाणपत्र, शेतकरी, शेतमजूर, व युवकांचे प्रश्नासह ईतर प्रश्नावर प्रशांत डिक्कर विधानसभेच्या सभागृहात आवाज उठवणार आहेत हा उद्देश समोर ठेवून जनता प्रशांत डिक्कर यांच्या पाठीशी उभी राहली आहे. भ्रष्टाचार मुक्त व व्यसन मुक्त मतदार संघ करुन गोर गरीब मायबाप जणता आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशांत डिक्कर यांनी मतदार संघावर चांगलीच पकड केली आहे. प्रचाराच्या पहिल्याच दिवशी मतदारांनी सोनाळा सर्कलमधुन लाडकी बहिणी कडुन 2 लाख 64 हजार रुपये लोकवर्गणी देऊन प्रशांत डिक्कर यांना मतदारांनी विजयी टीळा लावला आहे.
प्रशांत डिक्कर यांच्या प्रचारात सर्वच समाज घटकातील मतदारांनी संख्येने सहभागी होऊन दणक्यात प्रचाराला सुरुवात केली असल्याने आजच संजय कुटे यांचा गड ढासळला असल्याचे चित्र आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!