spot_img
spot_img

💥ब्रेकिंग ! जयश्रीताईंच्या विजयासाठी उद्धव ठाकरेंची 8 नोव्हेंबरला बुलढाण्यात तोफ धडाडणार ! -सिद्धार्थ खरात यांच्या प्रचारासाठी मेहकरातही सभा !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. निवडणुकांचे बिगुल वाजलं आहे. दरम्यान 8 नोव्हेंबरला बुलढाणा व मेहकर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांना पराभूत करण्याच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः जयश्रीताई शेळके यांच्या विजयासाठी बुलढाण्यात तर सिद्धार्थ खरात यांच्या विजयासाठी मेहकर येथे सभा घेणार आहेत.

सध्या राजकीय पक्ष अनेक बैठका, पत्रकार परिषद घेत आहेत. 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणूक पार पडणार असून 23 नोव्हेंबरला निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. त्यामुळे राजकीय पक्षांनी जोरदार तयारी चालवली आहे.शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड बुलढाण्यातून निवडणूक लढवीत असून त्यांना कडवी झुंज देण्यासाठी शिवसेना उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी कडून जयश्रीताई शेळके यांना उमेदवारी दिली आहे.तर मेहकर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटाची उमेदवार डॉ संजय रायमुलकर यांना टक्कर देण्यासाठी ठाकरे यांनी महाविकास आघाडी कडून सिद्धार्थ खरात यांना उमेदवार म्हणून रिंगणात उतरविल्याने उद्धव ठाकरे 8 नोव्हेंबरला बुलढाणा व मेहकर विधानसभा मध्ये सभा घेणार असल्याचे त्यांनी त्यांच्या दौऱ्यातील वेळापत्रकातून प्रसिद्ध केले आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!