spot_img
spot_img

💥क्राईम न्यूज ! दोन गटात राडा ! एक गंभीर जखमी, १९ व्यक्तिंवर गुन्हे दाखल !

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा/दर्शन गवई) येथील वार्ड क्रमांक एक मधील जाफराबाद मोहल्ल्यात लहान मुलांचे भांडणाचे रुपांतर दोन गटात हाणामारी पर्यंत जाऊन पोहचल्याने त्यात एक व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे . दोन्ही गटातील परस्पर विरोधी तक्रारीवरून १९ व्यक्तिंविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

साखरखेर्डा येथील जाफराबाद मोहल्ल्यात अमीर हमजाखान शाह अलीखान हे नमाज पठण करायला जात असताना घराशेजारी राहत असलेल्या मुक्तारशहा मुनीरशहा यांचा पुतण्या अमीर हमजाखान यांच्या नातवाला मारहाण करीत होता .तेथे भांडण सोडवून नातवाला घरी घेऊन गेले . त्याचवेळी आशपाक शहा यांनी शिवीगाळ करून धमकी दिली . त्यानंतर काही वेळातच अश्फाक शहा मुनिरशहा , अन्सारशहा मुनिरशहा , असीफशहा मुनीरशहा , मुक्तारशहा मुनीरशहा , तैजीबशहा मुनीरशहा , हे हातात कुऱ्हाड घेऊन आले , त्यातील अश्फाक शहा याने हातात दगड घेऊन स्वत: चे डोके फोडू लागला . तेव्हा तेथील त्याच्या नातेवाईकांनी त्याला पकडले आणि अश्फाक शहा याने पुन्हा धमकी दिली . फिर्यादीचा भाऊ सलीमखान हा दवाखान्यात जात असताना अश्फाक शहा ने मोटारसायकल थांबवून सलीम खान यास लोखंडी नागराच्या फाळावर उचलून फेकले त्यात सलीमचा पाय मोडला , हात तुटला व डोक्याला जबर मार लागला . त्यावेळी तेथील मुक्तारशहा , अन्सारशहा , आसीफ शहा , व इतर दोघांनी लाथा , बुक्यांनी मारहाण केली . या तंक्रारीवरुन सहा आरोपीतांवर कलम ११८(२) , १८९(२) , १९१(२) , भारतीय न्याय संहीता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तर सौ . आरेफाबी आशपाक शहा यांच्या यांनी आपल्या तंक्रारीत नमुद केले आहे की , मुलांच्या भांडणातून तन्वीर खान अमीर हमजाखान , तानीस खान अमजाखान , अफजलखान अस्लम खान , अस्लम खान अमनखान , नावडाखान अकरमखान , युसूफ खान अफसरखान , नदीमखान अफसरखान , ताजीमखान अफसरखान , अकबर खान , अफताज खान , मोनु उर्फ जाबाडा बाबु खान , गुल्फाकार खान अक्तरखान , जुबेर खान अक्तरखान सर्व रा . साखरखेर्डा यांनी घरात घुसून मला व पतीला मारहाण केली .आणि घर जाळून टाकू अशी धमकी दिली . फिर्यादी च्या तंक्रारीवरुन वरील सर्व व्यक्तींवर कलम ११५ (२) , ३५२ ,३५१(१),(३),१८९ (२) , १९१(२) भारतीय न्याय संहीता नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास ठाणेदार गजानन करेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेड कॉन्स्टेबल बाजीराव खरात करीत आहेत .

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!