spot_img
spot_img

💥पॉलिटिक्स ! “हर जोर और जुलूम के टक्कर मे संघर्ष हमारा नारा है!” -सतीश पवार म्हणाले..प्रस्थापित भांडवलदार व जातीयवादी उमेदवारांची दादागिरी वाढली ! -हजारों कार्यकर्त्यांच्या साक्षीने भरला उमेदवारी अर्ज !

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) वंचित शोषित पीडित दलित आणि अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार भाई चंद्रशेखर आझाद यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आजाद समाज पार्टी (कांशीराम) तथा भीम आर्मीचे बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सतीश पवार यांनी आज 28 ऑक्टोबरला हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.”हर जोर और जुलूम के टक्कर मे संघर्ष हमारा नारा है!” असे म्हणत सतीश पवार यांनी प्रस्थापित भांडवलदार व जातीयवादी उमेदवारांवर बोचरी टीका केली.

सतीश पवार यांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यांचे नामांकन दाखल करण्याकरिता
जिल्ह्यातील शेकडो भीमसैनिक तथा बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकरी, विचारवंतांना मानणाऱ्या बहुजनवादी विचारसरणीच्या तसेच बुलढाणा जिल्ह्यातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.दरम्यान सतीश पवार म्हणाले की ‘हर जोर और जुलुम के टक्कर मे संघर्ष हमारा नारा है ‘ हे पार्टीचे मिशन असून याच मिशनवर आम्ही लढत आहोत.प्रस्थापित भांडवलदार व जातीयवादी उमेदवारांची दादागिरी वाढली आहे.विकासाच्या नावावर केवळ मेकअप करण्याचे काम होत आहे.नीट शिक्षण नाही आरोग्य यंत्रणा ढिसाळली.सर्वसामान्यांना न्याय दुरापस्त झाला असून न शिकलेल्या विद्यार्थ्यांना बेरोजगारीचा सामना करावा लागत आहे.त्यामुळे त्यांना रोजगाराच्या संधी नाहीत.प्रत्येक क्षेत्रातील सर्व संधी उपलब्ध करून देण्यासाठी पार्टीच्या वतीने मी उमेदवार म्हणून निवडणुकीच्या मैदानात ताकतीने उतरलो आहोत मी उच्चशिक्षित असून माझ्या स्पर्धेत सध्या तरी कुणीच उमेदवार दिसत नसल्याचेही सतीश पवार म्हणाले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!