spot_img
spot_img

💥क्राईम विशेष ! आधी पाठलाग केला तर निसटला पण पकडलाच ! -गोवंश चोरट्यांच्या म्होरक्याच्या मुसक्या आवळल्या ! -बिबी पोलिसांची कारवाई! -तब्बल 10 गुन्हे उघडकिस!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) राजरोसपणे गोवंश चोरीला जाताहेत. त्यामुळे दक्ष झालेल्या बिबी पोलीसांनी दाखल असलेल्या गुन्ह्यातील चोरी गेलेली 125000 रुपये किंमतीची 4 जनावरे 4,00,000 व एक बोलेरो पिकअप वाहन असा एकूण 5,25,000 रुपये किमतीचा मुद्देमाल एलसीबीच्या मार्गदर्शनाखाली हस्तगत केला आहे.शेख रहीम शेख खमरूद्दीन वय 32 रा. हरसुल ग्रीन पार्क सोसायटी छत्रपती संभाजी नगर असे या अट्टल चोरट्याचे नाव आहे.जनावर चोरीच्या टोळीचा तो म्होरक्या आहे.

21 ऑक्टोंबर रोजी बिबि पोलीस ठाणे हद्दीतील एक बोलेरो पिकअप वाहन संशयरीत्या आढळून आले होते.या वाहनाचा पाठलाग सपोनी संदीप पाटील, सैफी,परमेश्वर शिंदे,अरुण सानप,भारत ढाकणे यांनी केला होता.मात्र सदर वाहन हे दुसरबीड टोल नाक्यावरून समृद्धी महामार्गावर गेल्याने या वाहनाचा पाठलाग छत्रपती संभाजी नगर पर्यंत करण्यात आला.संभाजीनगर येथे सावंगी नाका भागात हे वाहन पोलिसांची नजर चुकवून प्रसार झाले होते.त्यानंतर पोलीस स्टेशन हर्सूल व पोलीस स्टेशन फुलंब्री येथील पोलीस पथकांची मदत घेऊन बिबि पोलिसांच्या पथकाने याप्रकरणी कसोशीने तपास केला आणि संभाजीनगर येथील हरसुल, सावंगी नाका, गणोरी भागात पुण्यात वापरलेली बोलेरो पिकअप व आरोपी यांचा शोध घेतला असता जनावरे चोरी करणाऱ्या टोळीचा म्होरक्या पोलिसांना मिळून आला.या आरोपीला किनगाव जट्टू येथून चोरून नेलेले 5 जनावरे हरसुल भागातून आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आले आहे.आरोपीकडून वापरण्यात आलेली बोलेरो सिडको पोलीस स्टेशन हद्दीतून जप्त करण्यात आली आहे. शिवाय शेख रहीम शेख खमरूद्दीन या आरोपीकडून 10 गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.या गुन्ह्यातील इतरही आरोपीं निष्पन्न झाले असून याप्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे.ही कारवाई बीबी पोलिसांनी जिल्हा पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली व एलसीबी चे प्रभारी ठाणेदार अशोक लांडे यांच्या नेतृत्वात केली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!