बुलढाणा (हॅलो बुलढाणा)कायदा व सुव्यवस्थेबाबत सारं काही आलबेल असून कुणाला कायद्याचा धाक उरला नाही त्यामुळे चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. दरम्यान बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथील पार्किंग मधील चार चाकी गाडी उभी असताना गाडीचे काच फोडून त्यातील लॅपटॉप व सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपीने चोरून नेला होता. या आरोपीला 15 ऑक्टोंबर रोजी अटक करण्यात आली आहे.
चोरी कोणतीही असो परंतु चोरट्यांना पोलिसांचा धाक असायला पाहिजे.मात्र शहरात पोलीस विभागाची निष्क्रियता पाहता चोऱ्यांचे प्रमाण वाढत आहे. बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी येथील पार्किंग मधील चार चाकी गाडी उभी असताना गाडीचे काच फोडून त्यातील लॅपटॉप व सॅमसंग कंपनीचा मोबाईल असा तीस हजार रुपयांचा मुद्देमाल आरोपींनी चोरून नेला असता पोलिसांनी तपास चक्र फिरविले.पोलीस अधीक्षक विश्व पानसरे , अपर पोलीस अधीक्षक खामगाव, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांचे आदेशाने 15 ऑक्टोंबर रोजी पो. स्टे. बुलढाणा शहरहद्दीमद्ये अल्ट्राटेक इंजिनियर यांनी MH 29 AR 2682 चारचाकी गाडी बुलढाणा अर्बन रेसिडेन्सीच्या पार्किंग मध्ये उभी केली असता गाडीचा काच फोडून लॅपटॉप सॅमसंग कंपनीचा मोबाईल दोन्ही किमती 30 हजार रुपयेचा मुद्देमाल अज्ञात आरोपीने चोरून नेला होता.याप्रकरणी 908/2024 कलम 303 (2) ,324(4)BNS गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शेख अरबाज शेख महमूद वय 22 वर्ष रा. इक्बाल नगर वार्ड क्रं 06 बुलडाणा ता.जि .बुलडाणा याला अटक करण्यात आली आहे.या
आरोपी ने इंडियन बँक चे एटीएम डी एस डी मॉल बुलढाणा येथील फोडण्याचा प्रयत्न रात्री 22:30 वाजता केल्याची सीसीटीव्ही फुटेज वरून निष्पन्न झालेले आहे.










