बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने दोन हातभट्टी दादा जेरबंद केले असून या दादांना एक वर्षासाठी स्थान मध्ये करण्यात आले आहे.
मूलचंद जाधव मोहना,मेहकर व देवराज रामदास मेहेंगे रणथाम तालुका मलकापूर अशी आरोपींची नावे आहेत.
जिल्हाधिकारी यांचे एम पी डी ए कायद्याखाली आदेश असल्याने एलसीबीच्या पथकांनी सदर कारवाई केली.एमआयडीसी मलकापूर व जानेफळ हद्दीतील दोन हात भट्टीवाले गुन्हेगार एका वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. या गुन्हेगारांना अकोला येथील कारागृह येथे स्थलांतरित करण्यात येणार आहे.ही कामगिरी एसपी विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी चे अशोक लांडे व त्यांच्या पथकाने केली.










