बुलढाणा (हॅलो बुलढाणा) बेकायदेशीरपणे तलवारीने भर चौकात केक कापल्यावरही धाड पोलिसांनी उशिरा म्हणजेच 6 व्या दिवशी 8 जणांविरुद्ध थातूरमातूर कारवाई केल्याची बाब समोर आली आहे.विशेष म्हणजे “आर्म ॲक्ट” लावण्यात आला नाही. त्यामुळे धाड पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त होतोय.
भर चौकात धूम धडाक्यात वाढदिवस साजरा करण्याची क्रेझ दिवसागणिक वाढत आहे. काही अतिउत्साही तरुण कायदा विसरून खुलेआम तलवारीने केक कापून वाढदिवस साजरा करतात. नऊ इंचांपेक्षा जास्त लांबीच्या तलवारी आणि ब्लेड,जे स्वयंपाकघरातील उपकरणे नाहीत, त्यांना शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत परवाना आवश्यक आहे.
परंतु अति संवेदनशील असलेल्या बुलढाणा तालुक्यातील धाड या गावात पोलीस स्टेशन जवळच्या शिवाजी महाराज चौकात 7 सप्टेंबर रोजी तलवारीने केक कापण्याचा प्रकार घडला होता. सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापल्या जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच एक पथक त्या ठिकाणी दाखल झाले व पोलिसांनी तलवार जप्त केली मात्र त्याच वेळी गुन्हा दाखल केला नाही.धाड पोलीस कोणाच्या दाबावा खाली काम करीत आहे का?गुन्हा दाखल का केला नाही?असे प्रश्न उपस्थित झाल्याने धाड पोलिसांच्या या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात होता.अखेर धाड पोलिसांना मुहूर्त मिळाला आणि 12 सप्टेंबरच्या सायंकाळी 8 हुल्लडबाज तरुणावर गुन्हा दाखल करण्यात तर आला पण “आर्म एक्ट” लावण्यात आला नाही. 7 सप्टेंबर रोजी रात्री 11 वाजेच्या सुमारास धाड पोलीस स्टेशन जवळच शिवाजी महाराज चौकात अक्षय बिलांगे या तरुणाचा वाढदिवस साजरा करण्यात आला.आरोपी अक्षयने हातात तलवार नाचवत तलवारीनेच 5-6 केक कापले.याची माहिती मिळताच धाड पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांना पाहुन त्यातील काही हुल्लडबाज फरार झाले.पोलिसांनी तलवार जप्त करुन ठाण्यात आणली व घटनेची नोंद स्टेशन डायरित घेण्यात आली. सद्या गणेशोत्सव सुरु असून ईद ए मिलादुन्नबी सुद्धा साजरी होणार आहे.आगामी सर्वच सणउत्सव शांतेत पार पडावे यासाठी नव्याने रुजू झालेले पोलीस अधीक्षक विश्व पानसरे जिल्ह्यातील विविध ठिकाणी जावून शांतता समितीच्या बैठका घेत आहे.विशेष बाब म्हणजे अतिसंवेदनशील असलेल्या धाड येथे देखील एसपी पानसरे यांनी बैठक घेतली व सर्वांना शांततेचे आवाहन केले. तलवारी नाचवत काही तरुण शांतता भंग करण्याचे काम करता असतांना धाड पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल का केला नाही?हा प्रश्न धाड येथील शांतता प्रिय लोकांच्या मनात उद्भवत होता.गावातील शांततेचे वातावरण बिघडवणारे तरुण कोणत्या पक्षाशी निगडित आहे?त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ नये म्हणून कुणी पोलिसांवर दबाव तंत्राचा वापर करत होता का?कुणाच्या सांगण्यावरुन पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला नाही?असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते.शेवटी घटनेच्या 6 व्या दिवशी धाड पोलीस ठाण्यात फिर्यादी मंगल मिसाळ,पोउपनि यांच्या तक्रारीवरून आरोपी अक्षय जीवनलाल बिलांगे,जय पांडे,सुरज लोखंडे,गोलू गुजर,दीपक गुजर,राहुल दळवी,सुरज वाघ आणि रोशन गणेश शिंदे सर्व रा.धाड ता.जि.बुलडाणा यांच्या विरुद्ध मुंबई पोलीस अधिनियम कलम 135 (1) अन्वय गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी 13 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता दिली आहे.धाड पोलीस निश्चितच दाबावात काम करीत असल्याचे उदाहरण म्हणजे आरोपी विरुद्ध “आर्म एक्ट” न लावता या हुल्लडबाजांना पोलीसच वाचवताहेत,यावर शिक्कामोर्तब होत आहे.याप्रकरणी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी लक्ष वेधण्याची गरज आहे.










