spot_img
spot_img

”दया,कुछ तो गडबड है!” -आरोग्य उपसंचालकांना रुग्णालय भ्रष्टाचार प्रकरणी कारवाईचा मुहूर्त सापडेना!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) महाराष्ट्र अधिकाऱ्यांनी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोट्यावधींच्या भ्रष्टाचार प्रकरण वेशीवर टांगले.मात्र या प्रकरणी अकोल्याचे आरोग्य उपसंचालक पत्रकारांना माहिती द्यायला तयार नाहीत.त्यामुळे ‘कुछ तो गडबड है!’असे वाटणे सहाजिक आहे. झालेल्या भ्रष्टाचारात अन्य अधिकाऱ्यांचे हात असून,या हातांना हातकडी कधी लागणार?किती आणखी भ्रष्टाचार करण्यास मोकाट राहतील? असा प्रश्न सुजाण बुलढाणेकरांना पडला आहे.

जिल्हा आरोग्य रुग्णालयात कोरोना काळात
कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला.नव्याने ब्लड बँकेतही भ्रष्टाचार झाल्याची अपडेट समोर आली. तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मिळून भ्रष्टाचार केला असला तरी,केवळ भंडारपाल प्रकाश बोथे यावर कारवाईचा बडगा करण्यात आला. इतर भ्रष्टाचारी उजळ माथ्याने वावरत आहे.परंतु या भ्रष्टाचाराची पाडेमुळे खणून काढणार नाहीत ते पत्रकार कसले ? काही समाज कार्यकर्ते व पत्रकारांनी या भ्रष्टाचाराची पितळ उघडे पाडण्याचे ठरविले आहे.परंतु आरोग्य उपसंचालक माहिती देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप होतोय.त्यामुळे उपसंचालक ही संशयाचा घेऱ्यात आहे.कारण उपसंचालकांनी बुलढाणा आले असता सदर प्रकरणातील समितीच्या विभागीय चौकशीअहवाला नंतर दोषींवर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन दिले होते.13 ऑगस्ट ला विभागीय चौकशी अधिकारी यांची मुद्देनिहाय कारवाईचे पत्र उपसंचालकांना प्राप्त झाले आहे.परंतु उपसंचालक कोणत्या मुहूर्ताची वाट पाहताहेत हे रामजाने! ज्या भ्रष्टाचाऱ्यांनी आरोग्य विभागाची इज्जत चव्हाट्यावर आणली व भ्रष्टाचारातून कमावलेली करोडोची संपत्ती लुबाडली त्यांची अपसंपदा सील करून गंभीर स्वरूपाची फौजदारी कारवाई साठी पत्रव्यवहार करावा तसेच या भ्रष्टाचाऱ्यांच्या साखळीतील प्रत्येकावर विविध कलमाखाली गुन्हे दाखल करून त्यांना गजाआड करावे, पत्रकारांना व्यवस्थित माहिती द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!