बुलढाणा (हॅलो बुलढाणा) एक-दोन नाही तर तब्बल 8 मोटार सायकली चोरणारा अट्टल चोर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गजाआड केला आहे.
इमरान शहा दिलदार शहा (26)रा. खैवाळी नांदुरा या आरोपीने खामगाव मलकापूर, अकोला येथे एकूण 8 मोटरसायकली चोरून नेल्या होत्या.यामध्ये होंडा शाईन कंपनीच्या चार मोटरसायकली,एचएफ डीलक्स कंपनीच्या दोन मोटरसायकली, पॅशन प्रो , स्प्लेंडर प्लस एक अशा एकूण 8 मोटरसायकली लंपास केल्या होत्या.या गाड्यांची किंमत 3,20,000 रुपये सांगण्यात येत आहे. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीला शिताफिने अटक करून गाड्या जप्त केल्या. आरोपीविरुद्ध 303(2)बीएनएस 2023प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाईजिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक अशोक लांडे यांच्या आदेशाने 6 ऑगस्ट रोजी एपीआय रुपेश शक्करगे,एच सी पुरुषोत्तम आघाव,गणेश पाटील, जयंत बोचे , गणेश शेळके,विलास भोसले यांनी केली.










