देऊळगावराजा (हॅलो बुलढाणा) देऊळगाव राजा ते जालना रोडवरील मधुबन ढाब्या समोर दोन जुप्पीटरवरील दुचाकीस्वारांना एका वाहनधारकाने मागून धडक दिल्याने दोघे दुचाकीस्वार जखमी झाल्याची घटना घडली आहे.
विलास खरात यांनी फिर्याद दिली की, त्यांचा पुतण्या दिपक खरात रा. त्र्यंबक नगर, सिंदखेड रोड, देऊळगाव राजा व त्याचा मित्र संभाजी नन्नवरे रा. पिंपळनेर हे MH 28- BU 5680 क्रमांकाच्या ज्यूपीटरने चैत्रबन हॉटेल येथे जेवणासाठी जात होते. दरम्यान पाठीमागून येणाऱ्या MH 28- AN 1960 च्या चालकाने त्याचे वाहन भरधाव वेगाने व निष्काळजीपणे चालवून ज्यूपीटरला धडक दिली. यामध्ये ज्युपिटर वरील दोन्ही जण जखमी झाले आहेत. आरोपीविरुद्धगुन्हा दाखल केला असून,पुढील तपास जायभाये करीत आहे.










