बुलढाणा (हॅलो बुलढाणा) निष्ठावंत शिवसैनिकांच्या परिश्रम व त्यागामुळे उबाठा शिवसेनेची जिल्ह्यात पाळेमुळे खोलवर रुजली,असे विचार उद्धव साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्ताने घेण्यात आलेल्या सत्कार कार्यक्रमात भैय्यासाहेब मारोडकर यांनी व्यक्त केले.परंतु या निष्ठावंतांच्या सत्कार कार्यक्रमाला निष्ठावंतांनी दांडी मारली.
27 जुलै 1986 रोजी शिवसेनेची पहिली शाखा उभारणारे व शिवसेनेचा बालेकिल्ला बनवणारे तत्कालीन उपजिल्हाप्रमुख भैय्यासाहेब मारोडकर यांनीआज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
महात्मा फुले कॉन्व्हेंट चे सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मेहकरचे प्रथम शाखा स्थापनेचे शहरप्रमुख डॉ.शिवाजीराव चांगाडे होते.इतर पदाधिकाऱ्यांची किमान उपस्थिती होती.यामध्ये निष्ठावंत पदाधिकारी व शिवसैनिकांची गैरहजरी दिसून आली.