7.5 C
New York
Monday, November 25, 2024

Buy now

spot_img
spot_img

मेहकरात पिकविमा प्रश्न पेटणार! -महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीचा ‘आक्रोश !’

मेहकर (हॅलो बुलढाणा) पिकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकरांनी पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला असून आज २९ जुलै रोजी तुपकरांच्या नेतृत्वाखाली मेहकरात शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला. 8 दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पिकविमा, नुकसान भरपाईची रक्कम जमा न केल्यास राज्य सरकारला हादररुन सोडणारे राज्यव्यापी आंदोलन करु, असा इशारा रविकांत तुपकर यांनी मोर्चाला संबोधित करतांना दिला.

शेतकऱ्यांना गेल्यावर्षीचा १००% पिकविमा मिळावा तसेच नुकसान भरपाई मिळावी, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे, वन्यप्राण्यांनी शेतापिकांच्या केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, गेल्यावर्षीचा सोयाबीन-कापसाचा भाव फरक तातडीने मिळावा, घरकुलाचे रखडलेले पैसे तात्काळ मिळावे, तातडीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीचे राज्याचे प्रमुख नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मेहकरात शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा निघाला.
सत्ताधाऱ्यांनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी आम्ही आजवर विविध आंदोलने केली आहेत परंतू सरकार निगरगठ्ठपणे वागत आहे, त्यामुळे आता आम्ही सरकारला निर्वाणीचा इशारा देत आहोत. सरकार जर शेतकऱ्यांचा विचारच करणार नसेल तर सरकारला जागे करण्यासाठी आता आक्रमक आंदोलन करण्याची वेळ आली आहे, असे तुपकरांनी ठणकावले. यावेळी या मोर्चाला गजानन अमदाबादकर, डॉ.ज्ञानेश्वर टाले, डॉ.ऋतुजा चव्हाण, भैय्यासाहेब पाटील, गजानन कावरखे, सहदेव लाड यांनी संबोधित केले तर या मोर्चाला नामदेव पंतगे, ऋषांक चव्हाण, विनायक सरनाईक, प्रकाश गीते, गणेश गारोळे, वैभव आखाडे, जुबेर खान, भगवान पालवे, देवेंद्र आखाडे, गजानन चव्हाण, कैलास उतपुरे, विष्णू आखरे, प्रफुल्ल देशमुख, श्रीराम चलवाड, शिवाजी मेटांगळे, अरविंद दांदडे, कल्पना टाले यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!