spot_img
spot_img

‘हॅलो बुलढाणा’चा इम्पॅक्ट! -अखेर या रस्त्यावर दगडी मुरमाचे ढीग!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) ‘हॅलो बुलढाणा’ च्या बातमीने आणि गाडगेनगर रहिवाशांच्या रेट्यामुळे दुरावस्था झालेल्या रस्त्यावर अखेर दगडी मुरुमाचे ढीग टाकण्यात आले. शिवाय या रस्त्याचे काँक्रिटीकरण होणार असल्याचे देखील आश्वासित करण्यात आले.

मौजे सुंदरखेड येथील गट नं.65 मधील ओपन स्पेसचा श्वास गुदमरतोय! अशी बातमी ‘हॅलो बुलढाणा’ने नुकतीच प्रसारित केली होती. दरम्यान गाडगे नगरात रस्ता सुद्धा नाही. जीव मुठीत धरून नागरिकांसह चिमुकले विद्यार्थी ही वाट तुडवत आहेत. सदर अतिक्रमण मुक्त करुन येथे रस्ता करून द्यावा अशी मागणी, जिल्हाधिकारी यांना गाडगेनगरवासी यांनी केली होती. ही बातमी देखील ‘हॅलो बुलढाणा’ ने उमटविली होती. विशेष म्हणजे या नगरात सरपंच यांनी जेसीबी आणून करण्यात आलेले अतिक्रमण काहीसे हटविण्यात आले होते. परंतु एका महिलेने यावर आक्षेप घेतल्याने संपूर्ण अतिक्रमण हटू शकले नाही. दरम्यान येथील रहिवाशांनी आमदार संजय गायकवाड व सरपंच अर्पणा चव्हाण यांना रस्ता करण्याची मागणी केली. त्यामुळे येथे दगडी मुरमाची ढीग टाकण्यात आलेले आहे. सिमेंट रस्ता होणार सही सांगितले गेले आहे. सदर रस्ता सिमेंट काँक्रीटचा होतो की केवळ मुरूमच फैलवल्या जातो? याकडे लक्ष लागून नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!