spot_img
spot_img

खरिपात पावसानं फिरवली पाठ… रब्बीला आता तीन धरणांची साथ! डॉ. संजय कुटेंच्या बैठकीत सिंचनाच्या तीन आवर्तनांवर शिक्कामोर्तब!

जळगाव जामोद (हॅलो बुलढाणा /ज्ञानदेव राजनकर) अनियमित पावसाने खरिपात नुकसान सोसलेल्या शेतकऱ्यांना रब्बीसाठी दिलासा देणारा निर्णय झाला आहे. गोराळा, राजुरा आणि हत्तीपाऊल (धानोरा) या तीन धरणांमधून रब्बी पिकांच्या सिंचनासाठी तीन आवर्तने देण्याचे नियोजन करण्यात आले. आमदार डॉ. संजय कुटे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी, २८ नोव्हेंबर रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

गहू, हरभरा आणि इतर रब्बी पिकांसाठी हे पाणी मिळणार आहे. पाणी वापर संस्था आणि संबंधित विभागांच्या समन्वयातून तीन टप्प्यांत पाणी वितरित केले जाणार आहे. त्याआधी ३० नोव्हेंबर आणि १ डिसेंबर रोजी पाणी वितरण व्यवस्थेची प्रत्यक्ष चाचणी घेतली जाणार आहे. पिण्याच्या पाण्यासाठी आवश्यक साठा राखीव ठेवून उर्वरित उपलब्ध पाण्यातून सिंचनाचे नियोजन करण्यात आले आहे.

उपलब्ध पाण्याचे योग्य नियोजन करून रब्बी पिकांना वेळेत पाणी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे आमदार डॉ. कुटे यांनी बैठकीत सांगितले. यावेळी उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

खरिपाच्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांची भिस्त रब्बीवर आहे. त्यामुळे आता चाचणीनंतर पहिलं आवर्तन कधी सुरू होणार आणि पिकांना गरज असताना पाणी शेतापर्यंत पोहोचणार का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!