spot_img
spot_img

आमदार श्वेता महालेंचा दमदार पुढाकार… राजूरमध्ये मोफत तपासणी, पुढील उपचारांसाठी शिबिरातूनच रुग्णवाहिका थेट जामनेरला!

राजूर (हॅलो बुलढाणा), २८ नोव्हेंबर मोफत महाआरोग्य शिबिरात तपासणी करताना काही रुग्णांना पुढील उपचारांची किंवा शस्त्रक्रियेची गरज असल्याचे डॉक्टरांच्या निदर्शनास आले. या रुग्णांना शिबिरस्थळावरूनच रुग्णवाहिकेतून जामनेरच्या रुबी स्टार हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले.

‘देवेंद्र सेवा महोत्सव’ अभियानांतर्गत भाजप अल्पसंख्याक मोर्चाच्या बुलढाणा जिल्हा शाखेने बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील राजूर येथे शिबिराचे आयोजन केले. आमदार श्वेता महाले-पाटील यांच्या पुढाकारातून आणि अध्यक्षतेखाली पार पडलेल्या शिबिराला भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. मंत्री गिरीश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली राबवलेल्या या उपक्रमाला रुबी स्टार हॉस्पिटलचे वैद्यकीय सहकार्य मिळाले.

राजूर आणि परिसरातील नागरिकांना एकाच ठिकाणी हाडे, डोळे, रक्तातील साखर आणि रक्तदाबाची तपासणी करून घेता आली. सामान्य आरोग्य तपासणीसोबतच महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष तपासणीची व्यवस्था होती. दिव्यांग नागरिकांची तपासणी करून त्यांना प्रमाणपत्र मिळवण्याच्या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तज्ज्ञ डॉक्टरांनी मोफत वैद्यकीय सल्ला दिला आणि औषधोपचारांची माहिती दिली. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ कसा घेता येईल, याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.

स्थानिक नियोजनात भाजप अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस समीर खान, सागर हिवाळे, शादाब खान आणि अश्फाक शेख यांनी पुढाकार घेतला. भाजप जिल्हा महामंत्री दत्ता पाटील, बुलढाणा शहराध्यक्ष मंदार बाहेकर, शासकीय योजना प्रचार-प्रसार समितीचे जिल्हा संयोजक अंबादास घेवंदे, जिल्हा सचिव अशोक किन्होळकर आणि राजूरचे सरपंच डॉ. अनिस खान यांचीही उपस्थिती होती. महादेव शिराळ, सागर पवार, उमेश पाटील, मुकुंद देशपांडे, समाधान पाटील, संजय वाघ आणि जिल्हा वैद्यकीय समन्वयक दीपक राठोड यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिबिराच्या आयोजनात सहकार्य केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!