spot_img
spot_img

बुलढाण्याच्या पठ्ठ्यांनी गाजवलं मैदान! सहकार विद्या मंदिरचा संघ जिल्ह्याचा ‘अजिंक्य’ चॅम्पियन!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) मलकापूरचं मैदान… समोर शेगावचा तगडा संघ आणि इकडे बुलढाण्याची पोरं! शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या फायनलमध्ये शेगावचा १२ धावांनी पराभव करत सहकार विद्या मंदिर, बुलढाणाच्या १४ वर्षाखालील क्रिकेट संघाने जिल्हास्तरीय विजेतेपदावर आपलं नाव कोरलं आहे.

 

जिल्हा क्रीडा अधिकारी (DSO) बुलढाणा यांच्या वतीने मलकापूरला ही स्पर्धा झाली. सुरुवातीपासूनच सहकारच्या पोरांनी दमदार खेळ दाखवला. एक एक संघाला धूळ चारत ते फायनलमध्ये पोहोचले.
फायनलमध्ये शेगाव विरुद्ध सहकार असा सामना रंगला. दोन्ही संघ विजयासाठी झगडत होते. पण सहकारच्या पोरांनी नियोजनबद्ध फलंदाजी, भेदक गोलंदाजी आणि जबरदस्त सांघिक खेळाच्या जोरावर सामना आपल्या खिशात टाकला. शेवटी १२ धावांनी विजय आणि मैदानात एकच जल्लोष पाहायला मिळाला. या विजयी संघाचं नेतृत्व केलं ते वेदांशू सावळे याने. कॅप्टन म्हणून त्याने मैदानात शांत डोकं ठेवून संघाला सांभाळलं आणि विजयापर्यंत नेलं. प्रशिक्षक चेतन सोनोने सर म्हणाले, “शाळेच्या अध्यक्षा सौ. कोमलताई झंवर यांनी खेळाडूंसाठी दिलेल्या उत्कृष्ट सुविधांमुळेच हा विजय शक्य झाला.”म्हणजेच, चांगली सुविधा मिळाली की बुलढाण्याची पोरं काहीही करू शकतात, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. या यशाबद्दल बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी, अध्यक्ष डॉ. सुकेशजी झंवर, बुलढाणा अर्बन चॅरिटेबल सोसायटीच्या अध्यक्ष सौ. कोमल झंवर मॅडम, प्राचार्य, शिक्षकांनी सर्व खेळाडू आणि प्रशिक्षक चेतन सोनोने सर यांचं जोरदार अभिनंदन केलं आहे.या विजयामुळे सहकार विद्या मंदिरचा संघ आता विभागीय स्तरावरील शालेय क्रिकेट स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे.

▪️संघाचे हिरो ठरले हे १७ शिलेदार!

सार्थक उबाळे, कबीर बोर्डे, आयन शेख, राघव राजपूत, विरेन सपकाळ, साई बर्डे, आयुष हनवटे, ध्रुव पाटील, आदित्य काळे, अंशुल राऊत, पियूष ढाकणे, विहान हाडे, सोहम वरगणे, एस. ए. अल्विन गेलस्टन, ओमराजे देशमुख, सोहम आरू आणि परिमल कोठे ही नावं आता बुलढाण्याच्या गल्लोगल्लीत चर्चेत आहेत.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!