spot_img
spot_img

डॉ. रवींद्र गोफणे यांची देऊळगाव राजा तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती ; अभिनंदनाचा वर्षाव!

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यात सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी (ASSISANT DHO) म्हणून उत्कृष्ट कार्य करणारे डॉक्टर रवींद्र गोफणे यांची देऊळगाव राजा तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.डॉ. गोफणे हे आपल्या कार्यक्षमतेसाठी आणि रुग्णसेवेसाठी परिचित आहेत. त्यांच्या नियुक्तीमुळे प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे आणि तालुका रुग्णालयातील सेवा, लसीकरण, साथरोग नियंत्रण, माता व बाल आरोग्य यामध्ये गती येईल, असे मत व्यक्त केले जात आहे.सन २००५ मध्ये त्यांनी वरूड प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून आपल्या वैद्यकीय सेवेची सुरुवात केली. त्यानंतर चिखली तालुक्यातील शेळगाव आटोळ येथेही त्यांनी वैद्यकीय सेवा बजावली आहे.

त्यांच्या नियुक्तीचे वृत्त समजताच तालुक्यातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून त्यांचे हार्दिक अभिनंदन केले जात आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!