spot_img
spot_img

EXCLUSIVE! सुनगावच्या मातीत ‘महसुली खेळ’ की ९० ब्रासचा गोलमाल? १९० ब्रास उत्खननाचा आरोप, अहवालात फक्त १०० ब्रास! चौरे-वाघ यांच्या भूमिकेवर सवालांचा भडिमार! तलाठ्यांचा अहवाल तयार, मग कारवाईला ब्रेक कुणाचा? वरिष्ठ अधिकारी गप्प का?

सुनगाव (हॅलो बुलढाणा) विशेषजमीन पोखरली, मुरूम उपसला; पण महसूल विभागाच्या हिशेबातून तब्बल ९० ब्रास गायब झाले काय? जळगाव जामोद तालुक्यातील सुनगावमध्ये अवैध उत्खननाचा प्रकार चर्चेत आला असून महसूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नांचा भडिमार सुरू झाला आहे!

सुनगाव भाग क्रमांक २ मधील गट क्रमांक ४९६ आणि ४९७ येथील प्लॉटिंग परिसरात १७० ते १९० ब्रास मुरूम-मातीचे उत्खनन झाल्याचा नागरिकांचा दावा आहे. मात्र तलाठ्यांच्या अहवालात अवघ्या १०० ब्रासचीच नोंद असल्याचा आरोप आहे.

मग उर्वरित ७० ते ९० ब्रास कुठे गेले? मोजमापात चूक की आकड्यांमागे वेगळाच खेळ?

विशेष म्हणजे, तलाठ्यांचा अहवाल सादर होऊनही ठोस कारवाई झालेली नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. ग्राम महसूल अधिकारी चौरे आणि वाघ यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

त्यातच १८ तारखेला प्लॉटिंगमधील रस्त्यांसाठी नदीतील रूळीसदृश साहित्य विनापरवाना वापरल्याचाही आरोप आहे. महसूल यंत्रणेला हा प्रकार दिसलाच नाही काय?

शासनाचा महसूल बुडाला असेल तर जबाबदार कोण? उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई कधी?

स्वतंत्र फेरमोजणी, पंचनामा आणि संभाव्य महसूल नुकसानीची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!