बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आज गुरु पौर्णिमा! गुरूंसाठी काहीही दक्षिणा दिली जाते. पण संजय गायकवाड यांच्यासाठी कार्यकर्ते काहीही करू शकतात. बुलढाण्यातील एका कार्यकर्त्याने, आमदार संजय गायकवाड व त्यांचे पुत्र मृत्युंजय व पृथ्वीराज या दोन मुलांचे चित्र रेखाटण्यासाठी स्वतःचे रक्त वापरून त्यांची प्रतिकृती रेखाटली.
धर्मवीर युथ फाउंडेशनचा सदस्य असलेल्या कार्तिक पवार या युवकाने बुलढाणा विधानसभा मतदार संघाचे आ.संजूभाऊ गायकवाड, युवानेते मृत्युंजय गायकवाड व धर्मवीर फाउंडेशनचे अध्यक्ष पृथ्वीराज
यांचे चित्र रेखाटले..
▪️आ. गायकवाडही भारावले !
आ. गायकवाड, युवानेते मृत्युंजय, धर्मवीर युथ
भेटवस्तू कार्तिक पवार यांनी सुपूर्द केल्यानंतर
अचानक जेव्हा पेपर उघडला तेव्हा रक्ताने रेखाटलेले चित्र बघून आपल्या प्रती असे अनोखे प्रेम पाहून,आ. गायकवाडही थोडे स्तब झाले.