spot_img
spot_img

चार बहिणींचा एकुलता एक भाऊ जग सोडून गेला! १७ वर्षीय नवल बोरसेचा करुण अंत!

धामणगाव बढे (हॅलो बुलढाणा/ एस. बि. शेख) नियती केव्हा? कधी? कसा? डाव साधेल याचा नेम नाही.धामणगाव बढे येथील नवल राजू बोरसे (वय १७ वर्षे) या मूलाचा आज सकाळी अचानक चक्कर येऊन खाली पडल्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण धामणगाव बढे परिसरात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नवल बोरसे हा आज सकाळी सुमारे ८.३० वाजता घरातून कामासाठी निघाला होता. दरम्यान, रस्त्यात अचानक चक्कर आल्याने तो खाली कोसळून बेशुद्ध झाला. ही घटना लक्षात येताच उपस्थित नागरिकांनी व समाज बांधवानी तत्काळ त्याला धामणगाव बढे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
नवल हा आपल्या आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. त्याला चार बहिणी असून, कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तो मोलमजुरी करून कुटुंबाला हातभार लावत होता. त्याचे वडील राजू बोरसे हे हेअर सलूनचा व्यवसाय करतात. कुटुंबाचा आधार असलेला एकुलता एक मुलगा अचानक काळाच्या पडद्याआड गेल्याने आई-वडील, चार बहिणी आणि संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
अवघ्या १७ वर्षांच्या नवलचा असा अचानक मृत्यू झाल्याने गावातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्याच्या निधनाने परिसरात सर्वत्र शोक व्यक्त होत आहे. नवल बोरसे यांचा अंत्यविधी आज दुपारी २ वाजता धामणगाव बढे येथे होणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाइकांनी दिली आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!