बुलढाणा (हॅलो बुलढाणा) स्थानिक अन्न व औषध प्रशासनाने दि. १६ नोव्हेंबर रोजी मलकापूर शहरात दोन ठिकाणी कारवाई करून पान मसाला, सुगंधित तंबाखू व इतर पदार्थांचा एकूण ₹६४,३३२ किमतीचा साठा जप्त केला असून,विष विकणाऱ्यांचे धाबे आहे.
अन्न औषधी प्रशासनाने पहिली धाड लखानी चौक येथे टाकून ₹११,९०५ रुपयांचा साठा जप्त केला. आशिष चंपालाल मालपाणी असे आरोपीचे नाव असून गून्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरी धाड चारखंबा चौकातील मे. गजानन पान मंदिर येथे टाकण्यात येऊन ₹५२,४२७ चा पान मसाला व सुगंधित तंबाखू जप्तीची कारवाई करण्यात आली.
गजानन सुभाष भोईटे असे आरोपीचे नाव आहे. मलकापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासाअंती आधार आढळल्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोक्का) कारवाईचा विचार करावा, असा स्पष्ट उल्लेख फिर्यादींमध्ये करण्यात आला आहे.
▪️ कुणाच्या मार्गदर्शनाखाली कारवाई?
सह आयुक्त (अन्न), अमरावती विभाग श्री. स. द. केदारे, सहायक आयुक्त (अन्न), बुलढाणा, श्री. पी. एस. पाटील,अन्न सुरक्षा अधिकारी श्री. अ. सं. भोपाळे व श्री. जी. के. वसावे यांनी ही कारवाई केली.













Total Users : 3776146