spot_img
spot_img

भोंदूगिरी! थर्ड आय, मिड ब्रेनॲक्टिव्हेशनच्या नावाखाली पालकांच्या खिशाला कात्री! मानसशास्त्रज्ञ किशोर वाघ यांचा थेट हल्लाबोल!

खामगाव (हॅलो बुलढाणा) तुमचं मूल डोळे बांधून पुस्तक वाचेल, रंग ओळखेल, सुपर मेमरी येईल, असं सांगून तुमच्याकडून हजारो रुपये उकळले जात आहेत. तेव्हा सावध व्हा, हा चमत्कार नाही, हा शुद्ध धंदा आहे, असा हल्लाबोल अ.भा.अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मराठवाडा प्रमुख तथा मानसशास्त्रज्ञ किशोर वाघ यांनी केला.

स्थानिक नॅशनल हायस्कूल येथे शिक्षक प्रशिक्षणादरम्यान ‘शैक्षणिक क्षेत्रातील अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयावर त्यांचे विशेष व्याख्यान झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी गजानन गायकवाड होते. तज्ज्ञ मार्गदर्शक सतीश कोलते, प्रा. अनिल हिरळकर प्रमुख उपस्थित होते.
कशापासून सावध राहायचं? याचा त्यांनी पाठ घालवून दिला. सुपर सेन्सरी मेमरी, थर्ड आय, मिड ब्रेनॲक्टिव्हेशन इंट्यूशन प्रोसेस, मेधा योगा, सिक्रेट फास्ट रीडिंग या नावांनी जाहिराती येतात. “तुमचं मूल हुशार होईल, टॉपर होईल” असं सांगितलं जातं. परंतु याबाबत वाघ यांनी याचा पर्दाफाश केला. किशोर वाघ यांनी थेट सवाल केला की, याची वैज्ञानिक पडताळणी कुठे आहे? पुरावा कुठे आहे? फक्त स्टेजवरची २ प्रात्यक्षिके म्हणजे विज्ञान नव्हे! व्याख्यानाच्या प्रारंभी किशोर वाघ यांनी स्मरणशक्तीची विविध आश्चर्यकारक प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
प्रास्ताविक विजय बोरकर यांनी केले. संचालन प्रदीपकुमार सातव यांनी, तर आभारप्रदर्शन विनोद नखाते यांनी केले.

▪️ खरी गोष्ट केली उघड!

स्मरणशक्तीचे वैज्ञानिक नियम काय असतात? मनाची शक्ती म्हणजे काय? एकाग्रता कशी वाढते? अभ्यासाची योग्य पद्धत कोणती? चमत्काराने नाही, तर योग्य सरावाने आणि वैज्ञानिक पद्धतीने स्मरणशक्ती वाढते, हे त्यांनी प्रात्यक्षिकांसह दाखवून दिलं.

▪️पालकांनो, शिक्षकांनो हे लक्षात ठेवा!

मुलं डोळे बांधून वाचत नाहीत, त्यांना आधीच शिकवलं जातं. स्टेजवर दिसतं ते ट्रेनिंग असतं, थर्ड आय नसतो. पैसे देऊन बुद्धी विकत मिळत नाही. विद्यार्थ्यांनी कोणत्याही चमत्कारिक दाव्यांना बळी न पडता प्रत्येक गोष्टीची चिकित्सा करावी आणि जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारावा, असे आवाहनही त्यांनी केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!