बुलढाणा/अलाहाबाद ( वृत्तसंस्था/हॅलो बुलढाणा) आता रस्त्यात गाडी अडवून, चावी हिसकावून, धमकावून गाडी घेऊन जाण्याचे दिवस संपले. अलाहाबाद हायकोर्टाने फायनान्स कंपन्यांना असा दणका दिला आहे की, आता कोणतीही कंपनी गुंड, वसुली एजंट आणि पोलिसांच्या जीवावर तुमची गाडी जप्त करू शकणार नाही.
हप्ता थकला म्हणजे तुम्ही गुन्हेगार नाही, आणि कंपनी कोर्ट नाही. हाच या निकालाचा सरळ अर्थ आहे.
एका प्रकरणात सदाब अहमद यांनी डिसेंबर २०२३ मध्ये एचडीबी फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. कडून कर्ज घेऊन टाटा मालवाहू वाहन घेतलं होतं. ४७ हप्त्यांमध्ये परतफेड करायची होती. १ ऑगस्ट २०२६ रोजी कंपनीच्या वसुली एजंटांनी त्यांचे वाहन बळजबरीने घेतले. वाहन ताब्यात घेतल्याच्या कागदपत्रावर जबरदस्तीने सह्या घेतल्या.सदाब अहमद यांनी फायनान्स कंपनी, स्थानिक पोलिस,जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेतली पण वाहन परत मिळालं नाही. शेवटी त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली
कोर्टाने असे फटकारले की, गुंडगिरीला परवानगी नाही,खासगी फायनान्स कंपन्यांना गुंड, वसुली एजंटांच्या मदतीने कर्जदाराची वाहने बळजबरीने जप्त करता येणार नाहीत.पोलिस कंपनीचे नोकर नाहीत.खासगी संस्थेच्या हातात राज्याच्या बळाचा वापर करण्यासारखे अधिकार दिल्यासारखे होईल. पोलिस यंत्रणेचा वापर करून वाहन जप्त करता येणार नाही.कराराचा अर्थ दादागिरी नाही.भाडे-खरेदी करारानुसार कंपनीला वाहन ताब्यात घेण्याचा अधिकार आहे, पण त्याची अंमलबजावणी कायद्याने मान्य असलेल्या प्रक्रियेद्वारेच झाली पाहिजे. गुंडांना कामावर ठेवून बळाचा वापर करून ती करता येणार नाही.कंपनीला कोर्टातच जावं लागेल. कर्ज थकवलं असेल तर कंपनीला दिवाणी न्यायालयात किंवा लवादाकडे जाऊन योग्य आदेश मिळवणे आवश्यक आहे. रस्त्यात गाडी अडवून ताब्यात घेणे पूर्ण चुकीचे आहे.
▪️आदेश काय?
कोणतीही पूर्वअट न घालता वाहन तातडीने परत करण्याचे फायनान्स कंपनीला आदेश दिले. यातून
सर्वसामान्यांसाठी संदेश स्पष्ट आहे की,
हप्ता थकला म्हणून घाबरू नका. गाडी ओढून नेणे हा तुमचा अपमान नाही, तर कंपनीचा गुन्हा आहे.













Total Users : 3775467