spot_img
spot_img

शिंदीत कीर्तन संपलं… अन् शेकडो कार्यकर्त्यांच्या हाती भाजपचा झेंडा! सिंदखेड राजा मतदारसंघात गणेश नागरेंच्या नेतृत्वाखाली पक्षप्रवेश, महिला मंडळांचाही सहभाग

देऊळगाव राजा (हॅलो बुलढाणा/संतोष जाधव) शिंदीत स्व. दशरथराजे श्रीरामजी बंगाळे यांच्या पुण्यस्मरणानिमित्त कीर्तनसेवा झाली. त्यानंतर पक्षप्रवेश सोहळ्यात भाजपचे युवा नेते गणेश नागरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. नीलकुमार बंगाळे यांच्या शेतात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपचे बुलढाणा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विजयराज शिंदे होते.

सागर खांडेभराड यांच्या मित्रमंडळातील आणि महिला मंडळातील मिळून २०० कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अतिश राजे जाधव, सुरेंद्र कहाळे, चंद्रकांत काटे आणि राधेश्याम गायकवाड यांच्या मित्रमंडळातील २५ कार्यकर्त्यांसह महिला मंडळाच्या सदस्यांनीही पक्षात प्रवेश केला. सोपान सोनुने, छाया शिरसाठ आणि संगीता पाटोळे यांच्या नेतृत्वाखालील महिला मंडळाच्या सदस्यांचाही यात सहभाग होता.

‘प्रथम राष्ट्र, मग पक्ष आणि शेवटी स्वतः,’ अशी पक्षाची भूमिका असल्याचे विजयराज शिंदे यांनी सांगितले. केंद्र आणि राज्य सरकारच्या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. दुष्काळी परिस्थितीत राज्य सरकारने केलेल्या मदतीचा आणि जुना तांडा येथे दिवाळीनिमित्त भाजपने राबवलेल्या उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला. मतदार यादीच्या विशेष पुनरावलोकनावर बोलताना त्यांनी काँग्रेसच्या मतचोरीच्या आरोपांवरही टीका केली.

दरम्यान, आमदार श्वेता महाले यांनी गणेश नागरे यांच्या मोबाईलवरून नव्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांचे पक्षात स्वागत केले. यावेळी माजी आमदार तोताराम कायंदे, गणेश मांटे, विनोद वाघ, उल्लास देशपांडे आणि डॉ. सुनील कायंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रवेशामुळे सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या संघटनेला बळ मिळेल, असे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!