spot_img
spot_img

BREAKING भांडी खणखणली, खुर्ची हलली… ‘तुम्हालाही जाणवलं का?’ मलकापूर शहरासह उत्तर भागातील गावांना सौम्य धक्के!

मलकापूर (हॅलो बुलढाणा) दुपारची निवांत वेळ. कुणी घरात, कुणी दुकानात, तर कुणी शेतात. अचानक कुठे खुर्ची हलली, कुठे भांडी खणखणली, तर कुठे पंखा हलल्यासारखा वाटला. काही सेकंद नेमकं काय घडतंय, हेच कळेना. धक्के जाणवताच अनेकांनी घराबाहेर धाव घेतली. रस्त्यावर भेटलेल्या शेजाऱ्यांना पहिला प्रश्न होता, ‘तुम्हालाही जाणवलं का?’

मलकापूर शहरातील अनेक भागांसह तालुक्याच्या उत्तर भागातील काही गावांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. काही ठिकाणी कंप स्पष्ट जाणवला, तर काही भागांत तो अगदी हलका होता. अचानक झालेल्या हालचालीने लहान मुलं घाबरली. तोवर व्हॉट्सअॅप ग्रुपवर ‘भूकंप आला का?’ असा सवाल फिरू लागला. कोणत्या भागात धक्का जाणवला, याची चौकशी नागरिक एकमेकांकडे करू लागले. काही मिनिटांतच ही बातमी तालुकाभर पसरली.

प्रशासनाकडून गावनिहाय चौकशी

धक्क्यांची माहिती मिळताच तालुका प्रशासनाने गावागावांतून परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. सरपंच, पोलीस पाटील आणि तलाठी यांच्याशी संपर्क साधून कुठे धक्के जाणवले, घरांना तडे गेले का आणि मालमत्तेचे नुकसान झाले का, याची माहिती मागवण्यात आली.

मलकापूरकरांना दिलासा

प्राथमिक माहितीनुसार, या धक्क्यांमुळे कुठेही जीवितहानी झालेली नाही. घरांना तडे गेल्याची किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याचीही नोंद समोर आलेली नाही. त्यामुळे काही क्षणांसाठी घराबाहेर धाव घेतलेल्या नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!