साखळी बू. (हॅलो बुलढाणा) शेतकऱ्याने घाम गाळून पिकवलं. काढणी केली. शेतात सोयाबीन साठवून ठेवलं. स्वप्न होतं. बाजारात नेऊन पैसे आणायचे, कर्ज फेडायचं, घर चालवायचं…पण एका रात्रीत सगळं राख झालं.सोयाबीन जळालं, पण यंत्रणा झोपलीय का? १ लाख ८ हजारांची राख झाली.
दि. ११ नोव्हें.२०२६, सायंकाळी ६:३० वाजता ही घटना घडली.साखळी बू. भाग-२ मधील गट नं. ३४१ + ३४२, क्षेत्रफळ ०.६६ आर – सुनील गव्हाणे, रा. शिरपूर यांच्या शेतात ठेवलेल्या सोयाबीनला आग लागली. कुणालाच माहित नाही. कारण आगीचे कारण कळू शकले नाही असं पंचनाम्यात लिहिलंय.म्हणजे शेतकऱ्याचं नुकसान झालं, पण कारण शोधायला कुणीच नाही.
पंचनामा दि. १२ नोव्हे.२०२६ रोजी सकाळी ११ वाजता झाला.सोयाबीन – १४ पोते : ९५,००० रु., सुडीरील पट्टी ४,००० रु.,स्प्रिंकलर पाईप १२ नग ९,५०० रु. असा एकूण १,०८,५०० रु. (एक लाख आठ हजार पाचशे) रुपयांचा नासोडा झालाय.
▪️१ लाख ८ हजार म्हणजे काय?
शेतकऱ्यासाठी तो त्याच्या वर्षभराच्या मेहनतीचा घाम आहे. लेकरांच्या शिक्षणाचा पैसा आहे.घरातल्या भाकरीचा पैसा आहे. तो सगळा जळून गेला.













Total Users : 3756521