बुलढाणा (हॅलो बुलढाणा) जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणी टंचाईवरून आता लोकप्रतिनिधीच आक्रमक झाले आहेत. आमदार सिद्धार्थ खरात यांनी थेट जिल्हाधिकारी साहेबांना फोन लावून पाण्याचा प्रश्न निकाली काढण्याची मागणी केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
घरात खुर्चीवर बसून हातात कागदपत्रे घेऊन आमदार खरात कलेक्टर साहेबांशी अतिशय गंभीरपणे संवाद साधत आहेत. छोट्या धरणांमध्ये, बंधाऱ्यांमध्ये उपलब्ध असलेल्या पाण्याचा आढावा त्यांनी कागदावरूनच कलेक्टरांना दिला आणि शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी तात्काळ पाणी सोडण्याचा निर्णय घ्यावा, अशी ठाम मागणी केली.
हा व्हिडिओ कसला शो नाही, तर शेतकऱ्याची तहान भागवण्यासाठी एका आमदाराने केलेली थेट फिल्डिंग आहे. फाईलवर धूळ खात पडलेल्या प्रस्तावांऐवजी प्रत्यक्ष पाणी शेतापर्यंत कसे पोहोचेल, यासाठी खरात यांनी हा थेट संवाद साधला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत असून, “कलेक्टर साहेबांनी आता तरी निर्णय घ्यावा, नाहीतर बळीराजाची दिवाळी कोरडीच जाणार” अशी भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.





Total Users : 3696173