बुलढाणा (हॅलो बुलढाणा) आयुष्याची ३०-३५ वर्षे खाकी वर्दीत घालवून जनतेची सेवा करणाऱ्या सहा पोलीस अधिकारी-अंमलदारांना आज अखेर निरोप द्यावा लागला. बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील हे सहा जण दि. ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी नियतवयोमानाने सेवानिवृत्त झाले.
अप्पर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड आणि प्रभारी उपअधीक्षक (मुख्या) श्री. रवि राठोड यांच्या उपस्थितीत पोलीस अधीक्षक कार्यालय, बुलढाणा येथे दुपारी ४ वाजता त्यांचा सत्कार व निरोप समारंभ पार पडला.
श्रेणी पोउपनि गणेश माधवराव हिवरकर (ब.नं. २८६) पोलीस नियंत्रण कक्ष बुलढाणा, श्रेणी पोउपनि आत्माराम नामदेव जाधव (ब.नं. ११००) पोलीस कल्याण शाखा, सफौ धनराज ज्ञानदेव माने (ब.नं. ६१९) पो.स्टे. शेगाव ग्रामीण, सफौ गजानन रघुनाथ मुंढे (ब.नं. ५६७) पो.स्टे. शेगाव शहर, पोहेकॉ सुनील दगडू अहीर (ब.नं. २२७) पोलीस मुख्यालय बुलढाणा पोहेकॉ वासुदेव शंकर वानखडे (ब.नं. १८७२) पो.स्टे. शेगाव शहर या पोलिसांना निरोप देण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन पोलीस कल्याण शाखा, बुलढाणा तर्फे करण्यात आले होते. कार्यक्रमात पोनि गजानन कांबळे यांच्या शुभहस्ते सेवानिवृत्त झालेल्या अधिकारी-अंमलदारांना कुटुंबीयांसह शाल, श्रीफळ, पुष्पहार, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, मोमेंटो, झाडांचे रोपटे, बेडवस्तू, साडी देऊन सन्मानित करण्यात आले आणि भावी आयुष्यासाठी आरोग्यदायी शुभेच्छा देण्यात आल्या. सेवेत असताना कधी उन्हात, कधी पावसात, सण-उत्सव विसरून ड्युटी करणाऱ्या या शिलेदारांचा हा निरोप क्षण सर्वांसाठी भावनिक होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पोनि शशीस, इतर सफौ गजानन लहासे, पोहेकॉ किशोर ताजने, मपोहेकॉ रेखा बकाल यांनी विशेष प्रयत्न केले. सूत्रसंचालन पोहेकॉ निलेश रत्नपारखी यांनी केले. या निरोप समारंभाला सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय व नातेवाईक मोठ्या संख्येने हजर होते.





Total Users : 3696173