चिखली (हॅलो बुलढाणा/ सय्यद साहिल) राष्ट्रीय एकात्मता, बंधुता आणि अखंडतेचा संदेश देण्यासाठी चिखली पोलीस दलाने पावले टाकली! भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७ वाजता तालुका क्रीडा संकुल येथे ‘रन/वॉक फॉर युनिटी’ उपक्रम पार पडला.
बुलढाणा पोलीस दल व चिखली पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित या उपक्रमात ठाणेदार भूषण गावंडे यांच्यासह सर्व अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले. एकतेसाठी धावणे आणि चालणे या माध्यमातून पोलिसांनी राष्ट्रीय ऐक्याचा संदेश दिला.
देशाला एकसंध ठेवण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या सरदार पटेल यांच्या कार्याचे स्मरण या निमित्ताने करण्यात आले. समाजात बंधुभाव वाढावा, देशप्रेमाची भावना दृढ व्हावी आणि राष्ट्रीय एकात्मतेचा विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचावा, हा उपक्रमाचा उद्देश होता.
एकता आणि अखंडता ही देशाची ताकद आहे. याच विचाराला कृतीची जोड देत चिखली पोलिसांनी जयंतीनिमित्त एकतेचा जागर केला. सरदार पटेल यांना अभिवादनासोबतच समाजाला जोडणाऱ्या मूल्यांची जपणूक करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. राष्ट्रीय ऐक्याच्या भावनेला बळ देण्याचा प्रयत्न यावेळी झाला.गुडमॉर्निंग ग्रुप चे सदस्य, भरती पूर्व प्रशिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांनीही सहभाग घेतला





Total Users : 3696056