spot_img
spot_img

EXCLUSIVE! विधानावर खुलासा, निलंबनाच्या प्रश्नावर ‘नो कमेंट्स’! संजय गायकवाड म्हणाले – शेतकऱ्यांबद्दल बोललोच नव्हतो; भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी!

बुलढाणा (हॅलो बुलढाणा) शेतकरी आत्महत्यांसंदर्भातील वादग्रस्त विधानावरून राजकीय वातावरण तापले असतानाच आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या वक्तव्याचा वेगळा संदर्भ मांडला आहे. आपण शेतकऱ्यांबद्दल हे विधान केलेच नव्हते; व्यसनाधीन तरुणांच्या आत्महत्यांबाबत बोललो होतो, असा दावा त्यांनी केला. मात्र, पक्षाकडून निलंबनाच्या कारवाईबाबत विचारणा होताच त्यांनी ‘नो कमेंट्स’ म्हणत अधिक बोलणटाळले

दोन दिवसांपूर्वीच्या विधानावर प्रतिक्रिया देताना गायकवाड यांनी सांगितले की, नशेच्या आहारी जाऊन काही तरुण आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. त्यानंतर त्यांची कुटुंबे उघड्यावर पडतात. त्या कुटुंबांवर ओढवणाऱ्या संकटाच्या संदर्भातून आपण ते वक्तव्य केले होते. त्याचा शेतकऱ्यांशी संबंध नव्हता, अशी भूमिका त्यांनी मांडली.

आपल्या विधानामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आणि पक्षाच्या वरिष्ठांच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगिरी व्यक्त करतो, असेही गायकवाड यांनी स्पष्ट केले. त्यामुळे त्यांनी दिलगिरी व्यक्त केली असली, तरी मूळ वक्तव्य शेतकऱ्यांना उद्देशून नव्हते, या दाव्यावर ते कायम असल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेतून दिसते.

दरम्यान, पक्षीय कारवाईच्या प्रश्नावर मात्र त्यांनी भूमिका स्पष्ट केली नाही. निलंबनाबाबत विचारले असता दिलेले ‘नो कमेंट्स’ हे उत्तर आता त्यांच्या खुलाशाइतकेच लक्षवेधी ठरले आहे.

विधानाचा संदर्भ स्पष्ट करणारे आमदार गायकवाड पक्षाच्या कारवाईवर बोलणार कधी? त्यांच्या खुलाशानंतर आता पक्षाची अधिकृत भूमिका काय असेल, याकडे लक्ष लागले आहे. निलंबनाच्या चर्चेवर शिक्कामोर्तब करणारी माहिती मात्र या प्रतिक्रियेतून समोर आलेली नाही.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!