चांडोळ (हॅलो बुलढाणा/सलमान नसीम अत्तार) चांडोळमध्ये पिसाळल्याचा संशय असलेल्या कुत्र्याने दोन दिवसांत दहा जणांना चावा घेतल्याने खळबळ उडाली आहे. जखमींमध्ये लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असून, त्यांच्यावर बुलढाणा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
गावातील रस्ते, शाळा, अंगणवाडी, बाजारपेठ आणि बसस्थानक परिसरात मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्याने नागरिक धास्तावले आहेत. विद्यार्थ्यांना शाळेत पाठवायचे कसे, असा प्रश्न पालकांसमोर उभा ठाकला आहे. महिला आणि ज्येष्ठांनाही घराबाहेर पडताना भीती वाटत आहे.
दहा जण जखमी झाल्यानंतर तरी प्रशासन हलणार का? ग्रामपंचायतीने तातडीने उपाययोजना करून नागरिकांना सुरक्षितता द्यावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.





Total Users : 3686405