spot_img
spot_img

दगडफेक! मोहरम मिरवणूकीत तणाव! – माजी सरपंचासह अनेक जखमी! – परिस्थितीवर पोलिसांनी मिळविले नियंत्रण!

साखरखेर्डा (हॅलो बुलढाणा वार्ताहर) साखरखेर्डा येथील य मोहरम मिरवणुकीत दगडफेक झाल्याने काही जण जखमी झाले. परंतु पोलिसांनी वेळीच जमा पानगावला.

माळीपुऱ्यात राम मंदीराजवळ मिरवणूक पोहचल्यानंतर अचानक दगडफेक सुरू झाली. या दगडफेकीत १० ते १२ जन जखमी झाल्याची माहिती असून त्यांना उपचारासाठीपाठविण्यात आले आहे .उपरोक्त घटना ही १८ जुलै रोजी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.साखरखेर्डा येथील मोहरम मिरवणूक दुपारी तीन वाजता गुजरी चौकातून निघाली . रोहील पुरा, माळी पुरा आणि गरीब शहा बाबा दर्गा येथे (भोगावती नदीवर ) विसर्जन होणार होती. मिरवणूक माळी पुऱ्यातून जात असताना अचानक दगडफेक सुरू झाली. नेमकी दगडफेक सुरू होताच पळापळ सुरु झाली. यात माजी सरपंच कमलाकर गवई , माजी सरपंच दाऊद सेठ कुरेशी , माजी उपसरपंच आयुबसेठ कुरेशी , माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राम जाधव यांचेसह १० ते १२ जन जखमी झाले . पोलीसांनी तातडीने आश्रु धुराची नळकांडी फोडून जमाव पांगवला . त्यांनतर एका बाजूने हातात लाठ्याकाठ्या घेऊन काही युवक रस्त्यावर उतरले . परंतू उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील , साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे ठाणेदार स्वप्निल नाईक , रवी सानप आणि पोलीसांनी युवकांना पिटाळून लावले . ही वार्ता संपूर्ण गावात पसरताच संपूर्ण व्यापारी बाजार पेठेतील सर्व दुकाने पटापट बंद झाली . गुजरी चौकात पोलीसांनी तातडीने तगडा पोलीस बंदोबस्त लावला असून माळी पुऱ्यातही पोलीस कुमक वाढविण्यात आली आहे . बसस्थानक परिसरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे . जिल्हा पोलीस अधीक्षक सुनिल कडासने यांनी परिस्थितीची माहिती घेऊन मेहकर , बीबी , किनगाव राजा , बुलढाणा येथून राखीव पोलीस दल पाठवून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले आहे . वृत्त लिहीपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!