spot_img
spot_img

BIG EXCLUSIVE! सीओ साहेब, चिखलीत कुत्र्यांचं राज्य अन् प्रशासन झोपेत? आधी तरुणाला रक्तबंबाळ केलं, आता पाच वर्षांच्या चिमुकलीवर भरबाजारात झडप! एवढं होऊनही खुर्चीचा मोह सुटेना? मुख्याधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी; आता कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे कारवाईचा चाबूक उगारणार का?

चिखली (हॅलो बुलढाणा/सय्यद साहिल) चिखलीत कुत्र्यांची दहशत वाढत असताना नगर प्रशासन नेमकं करतंय तरी काय? नागरिक रस्त्यावर जीव मुठीत धरून फिरत आहेत आणि मुख्याधिकारी साहेबांच्या कारभारावर प्रश्नांचा भडिमार सुरू आहे! ‘हॅलो बुलढाणा’ने आधीच धोक्याची घंटा वाजवली होती. मात्र, आता पाच वर्षांच्या निष्पाप चिमुकलीवर कुत्र्यांच्या कळपाने हल्ला केल्याने नागरिकांचा संताप अनावर झाला आहे.

ख्वाजानगरातील झुबिया शेख आलमगीर (वय ५) भाजीपाला खरेदी करण्यासाठी आलेल्या आई-वडिलांसोबत बाजारात आली होती. रात्री ८.४५ वाजता गजबजलेल्या डीपी रोडवर कुत्र्यांच्या कळपाने तिच्यावर झडप घातली. हातावर आणि कमरेवर चावा घेतला. वडील आणि उपस्थित नागरिकांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला!

आधी यश चोपडा… आता चिमुकली झुबिया! पुढचा नंबर कुणाचा?

जुन्या मेहकर रस्त्यावर कुत्र्यांच्या पाठलागामुळे यश चोपडा दुचाकीवरून कोसळले होते. त्यांनाही कुत्र्याने चावा घेतला. ‘हॅलो बुलढाणा’ने संभाव्य अपघाताचा इशारा दिल्यानंतरही अशा घटना सुरूच असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सीओ साहेब, लाखोंच्या श्वान नसबंदी मोहिमेचा हिशेब कुठे? कागदावरची नसबंदी रस्त्यावर परिणाम का दाखवत नाही? नागरिकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी नेमकी कुणाची?

जिल्हाधिकारी देवरे साहेब, आता तुमच्याच कारवाईची चिखलीकरांना अपेक्षा!

बुलढाण्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी डॉ. प्रवीणकुमार देवरे यांनी या गंभीर प्रकरणात थेट हस्तक्षेप करून श्वान नसबंदीच्या खर्चाची, प्रत्यक्ष कामाची आणि नगर प्रशासनाच्या उपाययोजनांची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

चिखली न. प. च्या मुख्याधिकारी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणीही पुढे येत आहे
सीओ साहेब, आता तरी खुर्चीतून उठा! निष्पाप चिमुकल्यांचे रक्त सांडल्यानंतरही यंत्रणा हलणार नसेल, तर प्रशासनाच्या अस्तित्वाचा उपयोग काय? चिखलीकर म्हणतात जिल्हाधिकारी साहेब, या ‘कुत्ता गँग’च्या दहशतीला आळा घालण्यासाठी आता तरी कारवाईचा चाबूक उगारणार ना?

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!