spot_img
spot_img

रक्तदानाने नवरात्र उत्सवाचा मंगल प्रारंभ! म्हाडेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळाचा सामाजिक आदर्श!

बुलडाणा (हॅलो बुलडाणा) उत्सव म्हणजे केवळ मनोरंजन नव्हे तर सामाजिक बांधिलकीची जाणीव, हाच संदेश देत बुलडाणा शहरातील म्हाडा कॉलनी परिसरातील म्हाडेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळाने यंदाच्या नवरात्र उत्सवाची सुरुवात केली आहे.

शहरापासून काहीसं दूर, ज्ञानगंगा अभयारण्याच्या टोकावर नव्याने वसलेल्या म्हाडा कॉलनीत या मंडळाच्या वतीने दुर्गा मातेची स्थापना करण्यात आली आहे. पहिल्याच दिवशी डीजे आणि गोंगाटाला फाटा देत मंडळाने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराला म्हाडा वासीयांनी, विशेषतः तरुणांनी मोठा प्रतिसाद दिला. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” हा संदेश देत अनेक तरुणांनी रक्तदान करून नवरात्र उत्सवाला खऱ्या अर्थाने सामाजिक जोड दिली. जमा झालेले रक्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील गरजू रुग्णांसाठी उपयोगी पडणार आहे. या शिबिराचे उद्घाटन नगरपालिकेचे गटनेते कुणाल गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगरसेवक बबलू मोतवाल, सामाजिक कार्यकर्ते सोनू जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. आयोजकांनी रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले.

▪️फक्त उत्सव नाही, तर प्रबोधन

म्हाडेश्वर नवदुर्गा उत्सव मंडळाने यंदा नऊ दिवस, नऊ विषयांवर जनजागृती करण्याचा संकल्प केला आहे.
यामध्ये स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धन,बेटी बचाओ, बेटी पढाओ, व्यसनमुक्ती जनजागृती,महिला सुरक्षा आणि सन्मान,अवयवदानाचे महत्व
या सारख्या सामाजिक प्रबोधनपर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

spot_img

Related Articles

लोकप्रिय

error: Content is protected !!