चिखली (हॅलो बुलढाणा) चिखली तालुक्यातील वाघापूर-गोद्री रोडवर मृत्यू दबा धरून बसलाय! वाघापूर फाट्यावर काल सायंकाळी ७ वाजता पिल्लासह बिबट्याने रस्ता ओलांडत शेतकरी दिलीप पाटील यांच्यावर थेट झेप घेत जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पाटील यांनी प्रसंगावधान दाखवल्याने ते थोडक्यात बचावले, नाहीतर आज मोठा अनर्थ घडला असता!
सध्या सोयाबीन हंगामात शेतकरी जीव मुठीत घेऊन शेतात काम करीत असून, परिसरात हिंस्त्र प्राण्याची दहशत पसरली आहे. सदर घटनेची ही पहिली वेळ नाही. २ ऑक्टोबरलाच याच ठिकाणी बिबट्याचा वावर असल्याची लेखी माहिती शेतकऱ्यांनी वनविभागाला दिली होती. रात्री १० वाजता पथक आलं, टॉर्च मारली, पायाचे ठसे घेऊन “सतर्क राहा” म्हणून निघून गेलं! बस्स! त्यानंतर ८ दिवस झाले, ना पिंजरा, ना कॅमेरा, ना गस्त!
त्यामुळे वनविभाग फक्त पंचनामा करायला येणार का? माणूस मेल्यावर? असा जळजळीत सवाल आता अंत्री कोळी, साकेगाव, वाघापूरच्या शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. सध्या सोयाबीन काढणी ऐन जोरात आहे. शेतकरी, महिला मजूर पहाटे ५ पासून रात्री १० पर्यंत शेतात असतात. पिल्लासह असलेला हा बिबट्या जास्त हिंस्त्र असतो. उद्या एखाद्या लहान मुलाला किंवा महिलेला त्याने ओढलं तर जबाबदार कोण राहील? असा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला.
▪️शेतकऱ्यांची थेट मागणी, आता नाटक नको, कारवाई हवी!
वाघापूर फाट्यावर तात्काळ २ पिंजरे लावा,
ट्रॅप कॅमेरे बसवा, बिबट्याची नेमकी लोकेशन ट्रॅक करा, रात्रीची वनविभागाची गस्त सुरु करा






Total Users : 3597684