बुलढाणा (हॅलो बुलढाणा) येळगाव फाट्या नजिक ११ ऑक्टोबरच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास सायाळ या जंगली वन्य प्राण्याला एका दुचाकीची जबर धडक बसल्याने झालेल्या अपघातात एक जण गंभीर तर एक किरकोळ जखमी झाला आहे.वेळेवरच आरटीओचे ‘इंटरसेप्टर वाहन‘ मदतीला धावल्याने पुढील उपचार वेळेवर मिळण्यास मदत झाली आहे. गंभीर जखमींमध्ये गजानन मोती सिंग इंगळे (५०) यांचा समावेश आहे तर त्यांचा ११ वर्षीय पुतण्या किरकोळ जखमी झाला आहे.
येळगाव धरण परिसरातून सायाळ हा वन्य प्राणी रस्त्यावर आला असता, त्याला रात्रीच्या अंधारात गजानन इंगळे यांच्या एमएच २८ एजी २८७५ क्रमांकाच्या दुचाकीची जोरदार धडक बसली.झालेल्या अपघातात गजानन इंगळे बेशुद्ध वस्तीत पडून होते तर त्यांचा पुतण्या घाबरलेल्या अवस्थेत दिसून आला.दरम्यान प्रादेशिक परिवहन विभागाकडे (RTO) असलेले एक अत्याधुनिक प्रगत गस्ती वाहन या ठिकाणावरून जात असताना अपघातग्रस्तांना त्यांनी वेळ न दवडता उपचारार्थ जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले. व त्यांच्या नातेवाईकांना घटनेची माहिती देण्यात आली. त्यांना पुढील उपचारासाठी छ.संभाजीनगर कडे रवाना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. यावेळी (समोवनी) आशिष इंगळे व (चालक ) योगेश इंगळे यांनी सहकार्य केले.दरम्यान उपप्रादेशिक परिवहन अधिकारी पवन नव्हाडे यांच्या मार्गदर्शनाखाली महामार्गांवर होणारे अपघात रोखण्यासाठी आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवण्यासाठी ‘इंटरसेप्टर वाहन’ मदतगार ठरत आहे.




Total Users : 3596475